हे हेरंब
हे हेरंबा गौरीपुत्रा
पितृ कोपे झाले हनन
पितृ कृपेने झालास गजानन ।।
तुला शिवशंकराचे वरदान
अग्रपूजेचा मिळाला सन्मान ।।
गौरीनंदना तुज वंदन ।।
बंधू विलक्षण षडानन
प्रेमे देसी शुंडालिंगन
मातृपितृसेवे झालासी पावन ।।
मूषकावरी विराजमान
विविध रुपे तुझी शोभायमान
सकल कला गुण निधान ।।
भाद्रपद शुध्दचतुर्थी शुभदिन
उत्सुक होणार तव आगमन
दहादिवस भक्तीने करु नृत्यगायन ।।
विजया केळकर _______