बरेच दिवस झाले पेन घेऊन डूडल करणे, गिरगिटने सुरु आहे..
भरपूर काही नवं बनवलयं पण दाखवायला म्हणजे धागा काढून इथे पोस्टायला वेळ मिळेना..
हा उपक्रम डिक्लेअर झाल्यावर एक डूडल तो बनता ही है म्हणुन नक्की केलं ते तुमच्या समोर ठेवते आहे..
म्हणायला खरतर काही नवं किंवा भारी असं नाही तयार केलय बस ठिपके आहेत आपले..
७१व्या स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने माझं हे काम मी तमाम स्वातंत्र्यसैनिकांना ज्यांनी भारत या कल्पनेला मुर्त स्वरुप दिलं आणि जवानांना जे त्या कल्पनेला जागृत ठेउन तिची रक्षा करत आहे त्यांना समर्पित करते.
जय हिंद.. जय हिंद कि सेना..
माझा अगदीच गोंधळ उडाला होता - इथे इतक्यातच आलोय आणि आपलं चित्र अपलोड करावं का नाही .. पण करायचं ठरवलं कारण मला मैत्रीण आवडलं. इथे मस्त आर्टिस्ट आहेत आणि मला प्रतिक्रिया हव्या आहेत. म्हणजे सुधारणा खरंतर.
मी या वर्षी, माझ्या वाढदिवशी ठरवलं, आता स्वतःला जे आवडतं ते करायचंच. त्यासाठी शनिवार सकाळ राखुन ठेवलीये. मुलगी उठायच्या आत सर्व संपवायचं try करते. तेव्हा नवरोबा पण बॅडमिंटन खेळायला गेलेले असतात. मग काय छान शांतता असते दोनेक तास. तेव्हा मग मूड असेल तसं चित्र.
मला जलरंग हे माध्यम खूप आवडतं. कळते किंवा जमते असा आजिबात नाही पण मी प्रयत्न करतीये.
हॅलो मैत्रीणींनो,
काहीना ना काही काम करत राहायच्या सवयीमूळे बरेचदा काही गोष्टी हातून तयार होऊन जातात. बर त्या गोष्टींचा काही उपयोग असलाच पाहिजे, आपण पुढे त्या वापरल्याच पाहिजे हे असले फाल्तु प्रश्न त्यावेळी पडत नाही. उगाच हाताला, बोटांना काही काम म्हणुन करत राहायच, राहिलेलं काही हातावेगळं करायच. बरं ते क्रिएशन सर्वांन सेपरेट धाग्यात एक्स्प्लेन करुन सांगण्याइतपत मोठं किंवा गरजेच असावच असा आपला विचारही नसतो.
मुद्दा म्हणजे मी असल्या फालतू टिवल्याबावल्या भरपूर करत राहते. वाटल कि माझ्यासारखे आणखी कोण इथ असतील तर तेपन आपले स्पेअर टाईम उद्योग इथे शेअर करतील.
परीक्षा संपली पण अनन्याची कलाकृती आली नाही म्हणजे पोरगी अभ्यासाला लागली असे लोकांचे गैरसमज होऊ लागले , आडून आडून चौकशा व्हायला लागल्या ... नसत बालंट कोण घेणार अंगावर हा घ्या पुरावा आमच्या परीक्षा काळातील अभ्यासाचा