जलरंग / जीवनरंग १ -

माझा अगदीच गोंधळ उडाला होता - इथे इतक्यातच आलोय आणि आपलं चित्र अपलोड करावं का नाही .. पण करायचं ठरवलं कारण मला मैत्रीण आवडलं. इथे मस्त आर्टिस्ट आहेत आणि मला प्रतिक्रिया हव्या आहेत. म्हणजे सुधारणा खरंतर.

मी या वर्षी, माझ्या वाढदिवशी ठरवलं, आता स्वतःला जे आवडतं ते करायचंच. त्यासाठी शनिवार सकाळ राखुन ठेवलीये. मुलगी उठायच्या आत सर्व संपवायचं try करते. तेव्हा नवरोबा पण बॅडमिंटन खेळायला गेलेले असतात. मग काय छान शांतता असते दोनेक तास. तेव्हा मग मूड असेल तसं चित्र.

मला जलरंग हे माध्यम खूप आवडतं. कळते किंवा जमते असा आजिबात नाही पण मी प्रयत्न करतीये.
माझ्या मते ते असं माध्यम आहे की ज्यात लपवालपवी नाही करता येत फारशी. स्वच्छ - खरं.
त्यात मला ब्लॅक अँड व्हाईट combination अजूनच आवडतं. It challenges you.

चित्राबद्दल थोडंसं :
वर म्हणाले तसं ब्लॅक अँड व्हाईट मला आवडतं पण जलरंगात ते generally लोकांचा चॉईस नसतो. माझ्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रांच्या शोधात मला pintrest मुळे Elicia Edijanto च्या चित्रांची ओळख झाली आणि तिची style मला फार आवडली. तिची मी काढलेली दोन चित्र इथे share करते. मात्र चित्रांची नावं मला वाटली ती ठेवलीयेत -
१. Unique friendship

२. Solace

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle