black and white

जलरंग / जीवनरंग १ -

माझा अगदीच गोंधळ उडाला होता - इथे इतक्यातच आलोय आणि आपलं चित्र अपलोड करावं का नाही .. पण करायचं ठरवलं कारण मला मैत्रीण आवडलं. इथे मस्त आर्टिस्ट आहेत आणि मला प्रतिक्रिया हव्या आहेत. म्हणजे सुधारणा खरंतर.

मी या वर्षी, माझ्या वाढदिवशी ठरवलं, आता स्वतःला जे आवडतं ते करायचंच. त्यासाठी शनिवार सकाळ राखुन ठेवलीये. मुलगी उठायच्या आत सर्व संपवायचं try करते. तेव्हा नवरोबा पण बॅडमिंटन खेळायला गेलेले असतात. मग काय छान शांतता असते दोनेक तास. तेव्हा मग मूड असेल तसं चित्र.

मला जलरंग हे माध्यम खूप आवडतं. कळते किंवा जमते असा आजिबात नाही पण मी प्रयत्न करतीये.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

Subscribe to black and white
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle