हॅलो मैत्रीणींनो,
काहीना ना काही काम करत राहायच्या सवयीमूळे बरेचदा काही गोष्टी हातून तयार होऊन जातात. बर त्या गोष्टींचा काही उपयोग असलाच पाहिजे, आपण पुढे त्या वापरल्याच पाहिजे हे असले फाल्तु प्रश्न त्यावेळी पडत नाही. उगाच हाताला, बोटांना काही काम म्हणुन करत राहायच, राहिलेलं काही हातावेगळं करायच. बरं ते क्रिएशन सर्वांन सेपरेट धाग्यात एक्स्प्लेन करुन सांगण्याइतपत मोठं किंवा गरजेच असावच असा आपला विचारही नसतो.
मुद्दा म्हणजे मी असल्या फालतू टिवल्याबावल्या भरपूर करत राहते. वाटल कि माझ्यासारखे आणखी कोण इथ असतील तर तेपन आपले स्पेअर टाईम उद्योग इथे शेअर करतील.
हा धागा अशाच उद्योगांसाठी करुया. हुक्की आली म्हणुन तयार केलेल्या वस्तु.
यात कशाचाही समावेश होऊ शकतो बर.. एखादी फ्रेम, मॅट्रेस, विणकाम, हस्तकला विषयाखालील अगदी काहिही.तुमचे क्रिएशन इथे नक्की शेअर करा..