येत्या ४ ५ दिवसातच तोच तो आपला लाडका ऑक्टोबर सुरु होतोय आणि २०१८ पासुन मैत्रिणवर दर ऑक्टोबरला इन्क्टोबरचे वारे वाहतायत त्यालाच अनुसरुन यंदा ही ती प्रथा पाळावीच लागेल ना
पण ही प्रथा जाचक नाही हा नवनिर्मितीचा आनंद देणारी, उत्साहाने भारलेली अशी प्रथा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही तयार आहात ना इन्क्टोबर चॅलेंज साठी?? आपापली आयुधे तयार ठेवा बघू.. म्हणजे आपले स्केच बुक, पेन्स, ईन्क्स, ब्र्श ई... ३१ ऑक्टोबर पर्यंत धम्माल करु.
२००९ सालामध्ये "जेक पार्कर" या कलाकाराने (comics short-story creator, concept artist, illustrator, and animator) स्वत:चे चित्र-कौशल्य सुधारण्यासाठी आणि चित्रातून सकारात्मकता विकसित व्हावी या उद्देशाने "इन्क्टोबर"(Inktober) ही मोहीम चालू केली.
ही मोहीम म्हणजे ईंक(Pen and Ink) वापरुन केलेल्या चित्रांचा (drawing and illustrations) एक वार्षिक उत्सवच म्हणायला हरकत नाही. ही मोहीम त्याने ऑक्टोबर मध्ये चालू केली म्हणून ते इन्क्टोबर.