इन्क्टोबर (Inktober 2018)

२००९ सालामध्ये "जेक पार्कर" या कलाकाराने (comics short-story creator, concept artist, illustrator, and animator) स्वत:चे चित्र-कौशल्य सुधारण्यासाठी आणि चित्रातून सकारात्मकता विकसित व्हावी या उद्देशाने "इन्क्टोबर"(Inktober) ही मोहीम चालू केली.
ही मोहीम म्हणजे ईंक(Pen and Ink) वापरुन केलेल्या चित्रांचा (drawing and illustrations) एक वार्षिक उत्सवच म्हणायला हरकत नाही. ही मोहीम त्याने ऑक्टोबर मध्ये चालू केली म्हणून ते इन्क्टोबर.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात, पेन आणि ईंक वापरुन चित्रे काढणार्‍या जगभरातील तमाम चित्रकारांना "३१ दिवस ३१ चित्रे" हे चॅलेंज दिले जाते. ज्याला सहभागी व्हायचे आहे, त्याने आपण काढलेले चित्रं नेटवर अपलोड करताना #inktober हा हॅश टॅग वापरावा. यावर्षीचे हॅश टॅग आहेत.. #inktober आणि #inktober2018

२०१४ मध्ये ट्विटरवर हे इन्क्टोबर चॅलेंज दिल्यावर जगभरातील अनेक सहभागी कलाकारांनी इन्क्टोबर हा टॅग वापरुन आपआपली चित्रे सादर केली आणि या टॅग अंतर्गत तब्बल १००००० चित्रे ईंटरनेट विश्वात संकलित झाली... जोडली गेली.. हा एक विश्वविक्रमच झाला !!

ही सर्व माहिती जेव्हा माझ्या वाचनात आली, तेव्हा ही कल्पनाच मला खूप भन्नाट वाटली.
पेन आणि ईंक वापरुन चित्रे काढणे हा माझा आवडता विषय. पण मला त्यात सातत्य राखता आले नव्हते.
काही महिन्यांपूर्वी, दिवसामाजी एक चित्र काढावे हे ठरवून काही चित्रे काढली, पण पुन्हा ईतर काही व्यवधानांमुळे ते मागे पडलेच. आताही खरंतर हा धागा १ तारखेलाच काढायचा होता पण काही कारणाने राहून गेले.
ईथे खूप मैत्रिणी आहेत ज्या पेन आणि ईंक वापरुन चित्रे काढतात पण खूप दिवसात त्यांचीही काही चित्रे दिसली नाहीयत. या इन्क्टोबर (Inktober) निमित्ताने आपण ३१ तारखेपर्यंत रोज एक चित्र काढुया.
ईतर मैत्रिणींनीही यात सहभागी व्हावे. तुम्हाला येईल, जमेल तसे अगदी छोटेसे का होईना पण चित्र काढा. (चित्र, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, झेंन्टॅगल, डूड्ल ई.)

परफेक्शनपेक्षा स्ट्रेस बस्टर आणि सकारात्मक उर्जेसाठी ही मोहीम आहे त्यामुळे तुम्ही जे काढाल ते गोडच असेल
:)

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle