शीर्षक वाचून जरा गोंधळात पडला असाल ना? तुम्ही म्हणाल ईंक्टोबर झालं आता हे कसले नवीन खूळ आणलं हिनं?
तर काय झालं, सध्या फेसबुक, ईन्स्टा सगळीकडेच या हॅशटॅग खाली खूप सुंदर सुंदर चित्रे नजरेला पडतायत. ती बघून मलाही तश्या पध्दतीची चित्रे काढायचा मोह व्हायला लागला. म्ह्णून म्ह्टलं बघावं हे प्रकरण आहे तरी काय नक्की?