झेनडूडल वर्कशॉप अनुभव

२९ जानेवारीला ह्या वर्कशॉपची जाहीरात दिसली. वेळ पाहिली तर वर्कशॉपला थोडा वेळ होता. त्यांनी दिलेला वॉट्सअ‍ॅप गृपमध्ये सहभागी झाले.
ऑफीसमध्ये एकीकडे कामांची मोठी यादी होती. घड्याळाकडे लक्ष ठेवून होते.
ऑफीसमध्ये सगळं साहित्य नव्हतंच. प्रिंटींग पेपर वापरायचा ठरवलं. बॅगमध्ये पेन होताच. पेन्सिल, खोडरबर हाताशी होतेच. सहभाग महत्वाचा हे स्वतःला सांगत मी झूम मिटींग जॉईन केली.

हेडफोन स्पिकर , मायक्रोफोन हे बदलताना वेळ लागला आणि सुरवात जरा मिस झाली.
त्यात दिलेल्या सुचनेनुसार रेखाटन्याचे काम करत होते. एका कानात हेडफोने अडकवून तर एक कान कामासाठी रिकमा ठेवून काम पण सुरूच होते.

आपण जरा स्वत:साठी वेळ काढायचा म्हटला की इतरांना नेमकी तेव्हाच तुमची मदत हवी असते. ह्या नियमानुसार काही विद्यार्थी त्यांच्या कोडमधल्या एरर शोधायला आणि करेक्शन करून घ्यायला आले. त्यांना मदत करेपर्यंत एका कानाने ऐकायचे काम सुरूच होते. जमेल तितक्या वर्कशॉपच्या सुचना ऐकून काम करतच होते.
वर्कशॉपमध्ये शिकवलेले चित्र पुर्ण करणे शक्य नव्हते पण वेळ मिळताच ते पुर्ण करायचं नक्की ठरवलं.

झेन्टँगल आणि डूडलचे हे फ्यूजन भारी आवडले मला. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या आणि सहज भाषेत मार्गदर्शन मिळाले होते. शिक्षक उत्तम असले की त्यांनी शिकवलेला विषय सोपा वाटतो आणि आवडतोच. तोच अनुभव इथेही आला.

काल दुपारी जरा वेळ मिळाला मग नव्या जोमाने नवे चित्र काढून ते पुर्ण केले.

Art-Tuts by Lumière, ह्या वर्कशॉपमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद!

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle