२००१ पासून मी विविध विद्यापीठांचे नाट्यविभाग, विविध नाट्यप्रशिक्षण संस्था, मास कॉम कोर्सेस इत्यादी ठिकाणी कॉश्च्युम डिझाईन शिकवले/ शिकवते आहे.
आता पहिल्यांदाच पुढच्या आठवड्यात अश्या कुठल्या संस्थेच्या, पदवीच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसलेले असे माझे कॉश्च्युम डिझाईनचे वर्कशॉप होते आहे. फ्लेममध्ये मी कॉश्च्युम शिकवलेल्या बॅचेस मधील एक विद्यार्थिनी तितास दत्ता हिच्या कोलकात्याच्या ग्रुपने ही वर्कशॉप सिरीज आयोजित केली आहे.
वर्कशॉप ऑनलाईन असेल आणि माध्यम इंग्लिश/हिंदी असेल.
सर्वांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सवी कलेक्शन २०२१ - दागिने
सण, उत्सव ही परंपरा असते. परंपरेला धरून अनेक गोष्टी आपण करतो त्यात सणासुदीचे स्पेशल कपडेलत्ते, दागिनेही आले. तेही पारंपरिकच असतात. पण जसेच्या तसेच नुसते अनुकरण करण्यापेक्षा परंपरांकडे नवीन प्रकारे, आजच्या काळाच्या दृष्टीकोनातून बघणे आणि त्या प्रकारे परंपरांच्यात बदल करणे हे ही गरजेचे असतेच.
माझ्या नी या छोट्याश्या ब्रॅण्डला काल सहा वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऍनिव्हर्सरी कलेक्शन केले आहे.
यावर्षीच्या कलेक्शनमध्ये एकूण तीन सिरीजमधले दागिने आहेत.
१. म्हादेई सिरीज -2018 मध्ये ही सिरीज सुरू केली होती. त्यातलीच काही नवीन डिझाइन्स असतील यावर्षी.