माझ्या नी या छोट्याश्या ब्रॅण्डला काल सहा वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऍनिव्हर्सरी कलेक्शन केले आहे.
यावर्षीच्या कलेक्शनमध्ये एकूण तीन सिरीजमधले दागिने आहेत.
१. म्हादेई सिरीज -2018 मध्ये ही सिरीज सुरू केली होती. त्यातलीच काही नवीन डिझाइन्स असतील यावर्षी.
२. मासोळी - मासे हा फॉर्म फार इंटरेस्टिंग आहे खेळायला. माझ्या गेल्या कलेक्शनमध्येही काही मासे होते. मराठी दागिने आणि ओडिशा/ पश्चिम बंगालच्या साड्या या दोन्हींच्यात माश्यांची फार सुंदर motifs दिसतात. हे पारंपरिक मासे आणि आजूबाजूला दिसणारे मासे यांच्यापासून प्रेरणा घेऊन मासोळी ही सिरीज अस्तित्वात आली. त्यातली काही झलकनुमा डिझाइन्स या कलेक्शनमध्ये आहेत.
3. Twist with tradition: महाराष्ट्र - पारंपरिक दागिन्यांवरून प्रेरणा घेऊन, त्यांना आजच्या काळाच्या, तारादगडांच्या aesthetic शी जोडून समकालीन दागिने. अशी साधारण कल्पना आहे. या सिरीजमधले काही प्रयोग आधी केले आहेत. आता अजून डिफाईंड डिझाइन्स आहेत जी एका वेगळ्या ऑनलाईन एक्झिबिशनचा भागही असणार आहेत.
नेहमीसारखे एकाच दिवशी सगळे एकदम डिस्प्ले न करता कालपासून रोज एक असा नवीन दागिना डिस्प्ले करायला सुरुवात केली आहे.
हा पहिला दागिना
१. मासोळी पेंडन्ट - ओदिशा साड्यांतला मासा.
स्टील 18 गेज आणि कॉपर 23 गेज.
नैसर्गिक, अनपॉलिशड दगड.
२. N 0061 - म्हादेई सिरीज
कॉपर 18 गेज आणि स्टील 24 गेजचे accents.
३. N 0062 - पुन्हा एकदा तरंग.
तिसरा नेकलेस. म्हादेई सिरीज.
कॉपर आणि स्टेनलेस स्टील.
४. P 0016 - अजून एक मासोळी
कॉपरवर स्टीलच्या तारा.
Twist with Tradition -. महाराष्ट्र
काही वर्षांपूर्वी हीच थीम घेऊन काही दागिने बनवले होते. तेव्हापासून ही सिरीज करायचे डोक्यात होतेच. ते वारसामुळे शक्य झाले.
तन्मणी
पुतळ्याची माळ