अनेकींना कदाचित आठवत असेल 2015 च्या एप्रिलमधे मी माझा नी हा ब्रॅण्ड सुरू केला. एका कानातल्यांच्या कलेक्शनने सुरुवात केली होती.
सात वर्षे पूर्ण होताना म्हणजे एप्रिल 2022 मधे मी दागिन्यांपासून दूर जाऊन ताराचित्रे, मिक्स मिडिया यात उतरले.
आता दशकपूर्तीच्या निमित्ताने मी पुढचे पाऊल टाकते आहे. माझी तारा व मिक्स मिडिया चित्रे यांचे एकल प्रदर्शन पुण्यात करते आहे.
तारखा आहेत 8-13 एप्रिल. रोज सकाळी 11 ते संध्याकाळी 8. उदघाटन: 8 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता.
स्थळ: पी. एन. गाडगीळ & सन्स, हॅपी कॉलनी शाखा, कोथरूड, पुणे
हे सोशल मिडिया पोस्टर.