मुंबईत हजारो पर्जन्यवृक्ष (Raintree)मरणासन्न अवस्थेत आहेत. ह्याना वाचवायची जबाबदारी खर तर आपली व शासनाची आहे. उद्या त्यांचे शिल्लक राहीलेले सांगाडे काही बोलू शकणारेत का......?
कुणीतरी मरत होता
तरीही मनी भरत होता
मरणासन्न सांगाड्यावर
पर्णांचा बिलकूल वावर नव्हता
नावात त्याच्या पर्जन्य होता
तरी पावसाशी संबंध नव्हता
मुंबापुरीच्या कडेकडेने
सावली त्याची मिरवीत होता
अचानक आली अवकळा
पोखरून गेली वृक्षांना
नष्ट करुनी प्रजातीला
नात्याचा एक ओहोळ आटला
बसतात का मना डागण्या
पाहुनी त्या वृक्षांची दैना
सरकार दरबारी काही कळेना
झाडांच्या या मरणयातना
झाडझाडाला विचारु
त्यांच्या हत्येच्या कहाण्या
सरकार दरबारी विचारु
त्यांच्या आत्म्याच्या कहाण्या
अंजली मायदेव
२७/२/२०१५