पूर्वी घरासमोरच्या मैदानात एकट्या उभ्या सोनमोहोरावर लिहिलं होतं
आता त्याच्या आजुबाजुला बाग होत्ये...तेव्हा ते एकटा असल्याची त्याला खंत असेल असं मुलगा म्हणाला होता....
पुन्हा तोच सोनमोहोर
अजुनही न बहरलेला
त्याला माहितच नाही
त्याच्या भोवतीच्याओसाड मैदानाचं
आता नंदनवन झालय
सुंदर फुलांचे,सुंदर रंगांचे
ताटवे आजुबाजुला डोलू लागलेत
अरे आता तरी डोळे उघड
तुझे सोडून गेलेले काही सवंगडी
पुन्हा नाचू लागल्येत बरं का इथे
आता कुठेही पाहीलस तरी
प्रसन्नच वाटाव असं
चित्र तयार होतय इथे
फक्त तू बहर रे
फक्त तू बहर
आता सर्व तुला साजेसे
रहायला आले आहेत इथे
आठवतय आता मुलाचं बोलणं
एकुलता एक तू
सांगीन त्याला तुला दाखवून
संगतीतच खुलशील तू
पण हेही सांगीन त्याला
की संगत चोखंदळ हवी
स्वभावाच्या रंगांची
संगती जमून यायला हवी
एकदा का मैत्रीचे रंग जमले
की सजेल आयुष्याची रांगोळी
मग त्यावरच लिहिशील
हक्काच्या नात्यांच्या ओळी
अंजली मायदेव
१/२/२०१५