मी ना खूप बाबतीत अर्धवटराव आहे. मला लिहायला, चित्र काढायला, रंगवायला, मेहेंदी काढायला, फोटो काढायला, गायला, नाचायला नुसतं आवडतं. पण काहीच, कुठलीच गोष्ट अगदी भन्नाट जमत नाही. सगळं नुसतं जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ नन. ही मी काढलेली चित्रं/स्केचेस्/पेंटींग्ज..
मायबोलीवरील एका चित्रकाराने हॉटेल वैशालीचे अतिशय अप्रतिम पेन स्केच काढले होते. ते पाहून मी फार स्फुरीत होऊन वगैरे कॉपी करायचा प्रयत्न केला होता! कॉपीच आहे, पण फार आवडती कॉपी आहे माझी.. :) माझ्या इथल्या स्वयपाकघरात मी लावून ठेवली आहे ही फ्रेम. :)
तुळशीबागेत काहीतरी किट मिळते. म्हणजे ८ वर्षापूर्वी मिळत होते.. एक ब्राउन कापड, पांढरा अक्रेलिक रंग व नमुन्याचे चित्र - पोस्टकार्ड साईझ. त्यावरून हे खालचे वारली पेंटींग केले. हे ही खूप आवडते आहे माझे.. :) लग्नात रूखवतात ठेवले होते..
हे कधीतरी ट्राय केले आहे. कुठून पाहीले व काय मला काहीच आठवत नाही.
अजुन आहेत काही. फोटो काढून ठेवते.. :)