मोर हवा तर..............
मोर हवा तर, स्वतःच मोर झालं पाहिजे ना!
सत्य, शिव, सुंदराला
करताना आवाहन
स्वतःच कणखर व्हावे;
असत्याला, असत्य म्हणण्याइतके
अ-शिवाला संपवुन टाकणे पेलण्याइतके;
असुंदराची भलावण पाहताना
त्यांचा सल बाळगण्याइतके;
आपल्यातल्या शिवाला
होवुदे प्रकट
मर्ढेकरांच्या मुरारीकडे
मागण्या अनंत,
पण खरचं,
भंगु दे काठिण्य माझे
आम्ल मनीचे जावु दे
विवेकाच्या जिवंत झर्यात
मालिन्य सारे वाहुन जा वु दे
माझ्यातल्या शिवाला जाग येवु दे;
नाही मीच जाग आणिन
मोहिनी पिटके.