नि:शब्द सांजशा वेळी
तनू छेडीता धून
मौनाशी बोलते माझ्या
तुझे बोलके मौन
अस्पर्श मनीचा डोह
उठता झंकारून
तरंगातूनी त्यांच्या
हि तान घेतसे मौन
सुरावटींचा साज
लेवून गातसे मौन
निश्वासाचे अर्थ बघ
कसे सांगते मौन
अक्षय गाणे अपुले
हि अद्वैताची खुण
बोलक्या तुझ्या मौनाचे
कसे फेडू मी ऋण?
अवल आणि प्राची तुम्हा दोघींना हा माझा झब्बू. जुनीच आहे पण तुमचे सांग ना, बोल ना आणि अबोलीच वन वरुन आठवली