हेल्लो मैत्रीणिंनो... :waving: कश्या आहात सगळ्याजणी.
तुमची मदत हवी आहे. (नेहमीप्रमाणेच)
त्याच काय आहे. येत्या डिसेंबरात देवबाग, तारकर्ली फिरायला जायचं ठरतयं. (आम्ही दोघंच- लव्ह बर्ड्स मी आणि माझे होणारे अहो)
नेटवर सगळ्या साईट चेक करुन फार कन्फ्युझायला झालं राव. :confused: त्यामुळे मग म्हटलं आपल्या मैत्रिणी कधी कामी यायच्या.
चला तर मग लागा बरं सल्ले द्यायच्या कामाला. :devil:
जास्त महाग परवडायचं नाही बाई मला, त्यामुळे सगळं कसं बजेट मध्ये पाहिजे. (राहण्याची सोय, फिरण्याची ठिकाणं वगैरे बद्दलची माहिती)
तुमच्या सल्ल्यांची वाट बघतेय. :fadfad: