कोकण

कोकणातील काळे मोती ... करवंद

मे महिन्यात कोकणात आंबे फणस तर असतातच पण तोरणं, चारणं, शिवणीची फळं, जांभळं, करवंद असा रानमेवा ही खूप मिळतो. . विषय निघालाच आहे तर चारणं म्हणजे काय ते सांगते. आपण सुक्या मेव्यातली चारोळी आणतो त्याचं फळ म्हणजे चारणं. हे तसं आकाराने गोल आणि लहानच असतं. गर ही अगदीच थोडा असतो बी भोवती. पण ती बी फोडली की आत चारोळी असते. ह्या बिया फोडणे हे खूपच वेळमोडं आणि कटकटीचे काम आहे. ती एवढीशी बी हातात धरून स्वतःच्या हातावर मारून न घेता छोट्याशा हतोडीने बी वर हलकेच घाव मारायचा कारण जोरात घाव बसला तर आतल्या चारोळीचा चेंदामेंदा नक्की.

Keywords: 

लेख: 

कोकणातले दळणवळण..कालचे आणि आजचे:

कोकणातले दळणवळण..कालचे आणि आजचे:
rasta_0.jpg माहेरी गेलं की स्वागताला डांबरी रस्ता आणि जवळपास प्रत्येक घराशी एखादी तरी दोन चाकी, चार चाकी दिसतेच! आयुष्य सुखकर होण्यासाठी या गोष्टी लागतातच, त्याबद्दल मुळीच दुमत नाही.त्याचवेळी घराकडे वळताना दिसणारी ढोलाची घाटी अनेक आठवणी जागवते... सुरंगीची फुलं केसात माळली की जसा त्याचा पिवळा रंग केसांवर उतरतो आणि सुगंध सर्वदूर पसरतो तसा अनेक आठवणींचा रंग आणि गंध अलगद मनात उतरतो!

Keywords: 

दापोली - काय पाहावे काय खावे?

मी आधीची टाकलेली पोस्ट पोस्ट्च नाही झाली वाट्टत Sad
मुलीनो ,
मी दापोलीला फिरायला जात आहे ३ दिवस.तिथे राहणार्या, फिरुन आलेल्या मैत्रीणीनी मदत करा प्लीज.
काय काय फिरता येइल , आनि कुठे काय छान खायला मिळेल ही माहिती हवी आहे.
गुगल वरुन - कड्यावरचा गणपती, पन्हाळ्केजी लेणी, सुवर्णदुर्ग, जंजिरा अशी काही ठिकाण कळाली आहेत.अजुन काही असेल तर सांगा, आनि वर लिहलेली ठिकाणे (किल्ले सोडुन) कितपत बघंणेबल आहेत की आपला गप्प आराम करावा हेही सांगा.
धन्यवाद :)

Keywords: 

आमचं आगर

आगर म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर. अलिबाग साईडला वाडी ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तोच आमच्या भागात आगर ह्या शब्दाला.

आमचं आगर खूप मोठं आहे. पण आमचं घरच उतारावर असल्याने आगर ही तीन लेव्हल वर आहे . प्रत्येक लेव्हलला पाच सहा तरी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात आगरातल्या सगळ्या वाटा कोकणातल्या अति पावसामुळे उखडल्या जातात म्हणून दिवाळी पूर्वी सगळ्या वाटा चोपण्याने चोपून, शेणाने सारवून नीट केल्या जातात. घरात काही कार्य वैगेरे असलं की आगारातल्या वाटा ही अशा रांगोळ्या घालून सुशोभित केल्या जातात.दिवाळीत या वाटांवर पणत्या ठेवून त्या उजळल्या ही जातात . एरवी मात्र आगरात रात्री अगदी मिट्ट काळोख असतो.

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

गणपतीपुळे व आसपासची ठिकाणे

गणपतीपुळे येथे फिरायला जायचा प्लॅन आहे. Mtdc रेसॉर्ट कसे आहे रहायला? तसचं आजूबाजूची अजून पहाण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत? आणि जेवणाची उत्तम सोय कुठे होऊ शकते? लहान मुले बरोबर असणार आहेत.
मैत्रीणींनो, तुमचे अनुभव आणि माहिती शेअर कराल का?

Keywords: 

कोकण भटकंती

मैत्रिणींनो, तुमची मदत हवी आहे.

येत्या सप्टेंबर किंवा डिसेंबरात ४-५ दिवस कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करतेय, मे बी गोवा किंवा मग कोकणात कुठेतरी.... (मालवण फिरुन झालंय, रत्नागिरी बाकी आहे.)

तर त्यासाठीची प्रॉपर आयटेनररी देईल का मला कोणी बनवुन. त्यात कुठे रहावे?, बघण्यासारखी ठिकाणे,अंदाजे खर्च हे सगळं असेल तर वेल अँड गुड....

नेट वर वाचलयं बरंच पण सगळंच वाचुन कंफ्युझायला झालंय.....

प्लिझ हेल्प मी गर्ल्स... Praying

Keywords: 

देवबाग - तारकर्ली माहिती

हेल्लो मैत्रीणिंनो... :waving: कश्या आहात सगळ्याजणी.

तुमची मदत हवी आहे. (नेहमीप्रमाणेच)

त्याच काय आहे. येत्या डिसेंबरात देवबाग, तारकर्ली फिरायला जायचं ठरतयं. (आम्ही दोघंच- लव्ह बर्ड्स Blushing मी आणि माझे होणारे अहो)
नेटवर सगळ्या साईट चेक करुन फार कन्फ्युझायला झालं राव. :confused: त्यामुळे मग म्हटलं आपल्या मैत्रिणी कधी कामी यायच्या.

Keywords: 

दिवेआगरमधील आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती हवी आहे.

नमस्कार मैत्रिणींनो,

येत्या आठवड्यात पूर्ण कुटुंबासमवेत गावाला जाणार आहे. (माझं गाव रायगडमध्ये माणगाव). गावी २ दिवसांच काम आहे. ते झाल्यावर कुठेतरी २ दिवस भटकायचं प्लान करतेय. कुटुंबामध्ये आम्ही ३ बहिणी, भाऊ, आई आणि बहिणीचा लहान मुलगा (वय वर्ष ४) आहोत.

एक ठिकाण short लिस्ट केल आहे, ते म्हणजे दिवेआगर. अलिबाग गेल्या सुट्टीत फिरून झाला आहे. तर तुमच्यापैकी कोणाला तिथल्या पर्यटन स्थळांबद्दल माहिती असल्यास जरूर सांगावी. तसेच राहण्याची सोय, जेवण वगैरेचा अनुभव असल्यास जरूर सांगावे.

Keywords: 

Subscribe to कोकण
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle