काळी मैना

कोकणातील काळे मोती ... करवंद

मे महिन्यात कोकणात आंबे फणस तर असतातच पण तोरणं, चारणं, शिवणीची फळं, जांभळं, करवंद असा रानमेवा ही खूप मिळतो. . विषय निघालाच आहे तर चारणं म्हणजे काय ते सांगते. आपण सुक्या मेव्यातली चारोळी आणतो त्याचं फळ म्हणजे चारणं. हे तसं आकाराने गोल आणि लहानच असतं. गर ही अगदीच थोडा असतो बी भोवती. पण ती बी फोडली की आत चारोळी असते. ह्या बिया फोडणे हे खूपच वेळमोडं आणि कटकटीचे काम आहे. ती एवढीशी बी हातात धरून स्वतःच्या हातावर मारून न घेता छोट्याशा हतोडीने बी वर हलकेच घाव मारायचा कारण जोरात घाव बसला तर आतल्या चारोळीचा चेंदामेंदा नक्की.

Keywords: 

लेख: 

Subscribe to काळी मैना
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle