येत्या आठवड्यात पूर्ण कुटुंबासमवेत गावाला जाणार आहे. (माझं गाव रायगडमध्ये माणगाव). गावी २ दिवसांच काम आहे. ते झाल्यावर कुठेतरी २ दिवस भटकायचं प्लान करतेय. कुटुंबामध्ये आम्ही ३ बहिणी, भाऊ, आई आणि बहिणीचा लहान मुलगा (वय वर्ष ४) आहोत.
एक ठिकाण short लिस्ट केल आहे, ते म्हणजे दिवेआगर. अलिबाग गेल्या सुट्टीत फिरून झाला आहे. तर तुमच्यापैकी कोणाला तिथल्या पर्यटन स्थळांबद्दल माहिती असल्यास जरूर सांगावी. तसेच राहण्याची सोय, जेवण वगैरेचा अनुभव असल्यास जरूर सांगावे.