दुष्ट शब्द आला आज भेटायला...
खाडकन् थोबाडात मारली माझ्या
म्हणाला
अग दुष्ट या शब्दालाही मर्यादा असते काही
काही क़ायदे असतात दुष्टपणाचे!
तू ज्याला सारखी दुष्ट म्हणतेस
तो कधीचा ओलांडून गेलाय तुला
तुझ्याशी दुष्ट वागावं इतकिही तू
उरली नाहियेस आयुष्यात त्याच्या
दुष्ट म्हणायचच असेल तर म्हण स्वतःलाच
किती छळ स्वतःचा?
इतका त्रास तर त्यानेही दिला नसेल तुला
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle