महिला दिनानिमित्त खेळ - मी ही अशी !

सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज महिलादिनाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणींसाठी घेऊन आलो आहोत एक खेळ - मी ही अशी!

हा तसा म्हटला तर खेळ, आणि तसा म्हटला तर स्वतःशीच साधलेला संवाद...

रोजच्या धावपळीत आपल्याला स्वतःत डोकावून बघायला, स्वतःशीच संवाद साधायला वेळ कुठे असतो? आपलेच कितीतरी पैलू, छोट्याछोट्या गोष्टी, छोटी छोटी स्वप्नं आपण मनाच्या कोपर्‍यात सारून ठेवलेली असतात. त्या सगळ्या आठवणी, गुपितं, तपशील, एखाद्या प्रसंगातील आपली उत्स्फुर्त प्रतिक्रिया, अशा बारीकसारीक पण तरीही खास बाबी या निमित्तानं पुन्हा वर आणायच्या आहेत. आणि काही मजेशीर प्रश्नांना उत्तरंही द्यायची आहेत.

तुमची उत्तरं एका शब्दात असू देत, अथवा एका वाक्यात, अथवा एका परिच्छेदात. अगदी अनेक परिच्छेद भरणारीही चालतील. या निमित्ताने तुम्हाला व्यक्त व्हावसं वाटत असेल तर आम्ही सगळ्या वाचायला उत्सुक आहोतच.

आम्ही आठवडाभर रोज तीन प्रश्न देणार आहोत. तुम्ही एकच करायचं की, या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्यायची आहेत. यात चूक अथवा बरोबर असं काहीच नाहीये. तर तय्यार?

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle