महिला दिन

महिला दिन २०२०

mahiladin2020.png

सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

एकविसाव्या शतकाचं दुसरं दशक संपलं तरीदेखील अनेकविध क्षेत्रात प्रकर्षाने जाणवणारी महत्त्वाची बाब म्हणजेच स्त्री -पुरुष असमानता. मग ती नोकरी -उद्योगात स्थान मिळवण्यासाठी असो, आर्थिक मोबदला - बढती बाबतीतली असो किंवा अगदी कळत- नकळत केला जाणारा भेदभाव. ह्याच विषयाला अनुसरून यंदाच्या महिलादिनाचं सूत्र ठरवण्यात आलंय : #EachforEqual

महिला दिनाची साइटच पहा-

Keywords: 

उपक्रम: 

जागतिक महिला दिन : सुरुवात आपल्या घरापासून

महिला दिन: सुरुवात आपल्या घरापासून !

8 मार्च जागतिक महिला दिन जवळ आला की सुरुवात होते ती स्त्रिया किती मोठ्या पदांवर काम करतायत, कशा प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्यात याबद्दलच्या भारंभार भाषणाची! खूप साऱ्या स्पर्धा, सोशल मीडियावर शुभेच्छा... चला एक दिवस साजरा झाला की परत तेच रोजचं रहाटगाडगं सुरू होतं.

Keywords: 

जागतिक महिला दिन

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात, सर्वांना माहित असेलच... लवकरच हा दिवस येत आहे... आमच्या परिवारातील आम्ही सगळ्या महिला या दिवशी एकत्र बाहेर जेवायला जातो आणि विशेष म्हणजे आम्ही सर्वजणी सारखे ड्रेसेस घालतो... खूप मज्जा करतो... हा उपक्रम गेले काही वर्षे चालू आहे... त्यात सगळी नाती एकत्र येतात आई - मुलगी, बहीण, सासू- सून, आत्या, मावशी, जावा- जावा.... जवळ जवळ तीन पिढ्या एकत्र येतात. सर्व काही छान वाटते.

Keywords: 

लेख: 

महिला दिनानिमित्त खेळ - मी ही अशी !

सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज महिलादिनाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणींसाठी घेऊन आलो आहोत एक खेळ - मी ही अशी!

हा तसा म्हटला तर खेळ, आणि तसा म्हटला तर स्वतःशीच साधलेला संवाद...

Keywords: 

उपक्रम: 

Subscribe to महिला दिन
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle