तगमग

भेट ठरली की होते
भेटलास तरी होते
भेट संपत आली म्हणून होते
भेट संपली म्हणूनही होते
पुन्हा तू भेटावास म्हणून होतेच
तगमग
तू असलास की
तू हसलास की
तू पाहिलस की
तू बोललास की
तू नसलास की होतेच
तगमग
तू मिठीत घ्यावस म्हणून
मिठीत घेशील म्हणून
मिठीत घेतलस तरिही
मिठी सैल होताना आणि
मिठी निसटली तरी होतेच
तगमग!!!

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle