एक अनुवाद : Union Square: BY SARA TEASDALE (1884–1933)

एक कविता सगळ्याजणींसाठी , आशा करते की आवडेल :) , हा एक अनुवाद आहे -
विषय असा- एखादी साधी मधुर रचना असते. निखळ आनंद देते ती वेदना पोचवतानाही.वेदनेला सुंदर करण्याची ही प्रेरणा कविताच देत असते .. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला ते जवळ राहूनही कधी कळलंच नाही. आपणही संकोचाची सीमा ओलांडू शकलो नाही. अगदी सर्वसामान्य स्त्रीच्या भावजीवनात घडू शकणारी गोष्ट.’ Union Square’(1911) या SARA TEASDALE (1884–1933) यांच्या याच विषयावरील कवितेत मन असं गुंतून पडतं की जणू ही काल-आजची गोष्ट आहे !पण या कवितेचा शेवट मात्र विलक्षण धीट आहे.खिन्न करणारा आहे. तो आजच्या काळातही पचवायला जड वाटेल ..

रस्त्यावरच्या दिव्यांच्या लख्ख प्रकाशात चालत गेले त्याच्याबरोबर,
मी जीव ओवाळलाय ज्याच्यावर, पण ज्याचं नाही प्रेम माझ्यावर
न्याहाळत होतो आम्ही कसे परततात सारेच घरी रात्र पडल्यावर
यूनियन स्क्वेअरच्या उसळलेल्या गर्दीतून वाट काढत होतो भरभर

त्याच्या दिशेने कलत मी, कानात आणून प्राण,त्याला ऐकण्यासाठी
तरंगत येणाऱ्या हिमासारखे वजनरहित त्याचे शब्द झेलण्यासाठी
ताठ चालत होता तो मात्र ,जराही न झुकता, जराही न ऐकता ,
माझ्या हृदयाने तळमळत त्याला घातलेली साद समजून न घेता.

चालत गेलो चालतच गेलो आम्ही दूरवर कितीतरी चालत राहिलो
मागे राहिली सिनेमागृहांची भगभगीत प्रकाशवर्तुळं, त्याहीपुढे गेलो
त्या परिसरापर्यंत, मुली दिसतात उपाशी नजरेने रेंगाळताना जिथे
माहिती असतं पुरुषांना नेमकं काय चाललेलं असतं त्या तिथे ..

चालत गेलो चालतच गेलो आम्ही दूरवर कितीतरी चालत राहिलो
पोचलो दरवाजाशी अखेर ,उच्चारत निरोपाचे शब्द आम्ही थबकलो
त्याचं स्मित दिसलं जेव्हा मला ,शेवटच्या क्षणी, वेळ संपलेली
कळलं मला, त्याने माझ्या हृदयाची आर्त हाक नव्हतीच ऐकलेली

मी जीव ओवाळलाय ज्याच्यावर, पण ज्याचं नाही प्रेम माझ्यावर
रस्त्यावरच्या दिव्यांच्या लख्ख प्रकाशात चालत गेले त्याच्याबरोबर.
आठवत राहिल्या त्या मुली प्रेमाची भीक मागत ताटकळलेल्या
त्या मुली . त्या रात्री यूनियन स्क्वेअरच्या प्रकाशात दिसलेल्या..

---------------------------------------------------------------------------------------------------------
With the man I love who loves me not,
I walked in the street-lamps' flare;
We watched the world go home that night
In a flood through Union Square.

I leaned to catch the words he said
That were light as a snowflake falling;
Ah well that he never leaned to hear
The words my heart was calling.

And on we walked and on we walked
Past the fiery lights of the picture shows —
Where the girls with thirsty eyes go by
On the errand each man knows.

And on we walked and on we walked,
At the door at last we said good-bye;
I knew by his smile he had not heard
My heart's unuttered cry.

With the man I love who loves me not
I walked in the street-lamps' flare —
But oh, the girls who ask for love
In the lights of Union Square...

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle