महाराष्ट्र म्हटले कि मराठी माणूस... आणि मराठी माणूस म्हटले कि छत्रपती शिवाजी महाराज...... त्यांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी ३५० वर्षांपूर्वी केलेले कर्तृत्व आपल्या सर्वांनाच माहितीच आहे.... अगदी लहान असल्यापासून आपण इतिहासात वाचत आलो आहोत... ते अगदी जीव जोखिमेत घालून हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंत.... मला काही फारसे इतिहास सांगायचं नाही आता, महाराजांनी जिंकलेले, घडवलेले किल्ले, गड़ सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड, जंजिरा आणि खूप काही, आता आपल्यासाठी पिकनिक स्पॉट झाले आहेत.... हो आपण नक्कीच त्यांना भेट द्यायला हवी, तेव्हाच कळेल कि तेव्हा काहीही गाडी, मोबाईल, व्हाट्स आप, फेसबुक नसताना कसा काही महाराजांनी सर्व काही जुळवून आणले..... खरंच आश्चर्यकारक आहे, आता नुसतं गड़ चढायच म्हटले कि धाप लागते.... आपला आजचा तरुण खूप हुशार, सुशिक्षित, जवाबदार आहे. ते ग्रुप्स सोबत ऍडव्हेंचर ट्रिप म्हणून आपल्या गडावर ट्रेककिंगला जातात, फक्त एकच विनंती आहे, ह्या आपल्या ऐतिहासीक वास्तूंचा दर्जा हा आपल्या मंदिराप्रमाणे आहे, त्यांना तिथे जाऊन दारू पिऊन, पार्ट्या करून, कचरा करून अपवित्र करू नका... तुमच्यासारखे काही तरुण ह्या वास्तूवर होणार अन्याय पाहून "स्वच्छता मोहीम राबवतःयात" ते त्यांचे शनिवार / रविवार तुम्ही केलेला कचरा साफ करण्यासाठी एकत्र येताहेत..... सध्या हि मोहीम रायगडावर राबवली जात आहे....( सेवेचे ठायी तत्पर) हल्लीच माझा लहान भाऊ निशांत त्यांच्यासोबत गेला होता, मला वाटले हा नेहमीप्रमाणे पिकनिकला गेला, पण आल्यावर त्याने जेव्हा मला ह्या मोहिमेची माहिती सांगितले आणि तेथील फोटो दाखविले, तेव्हा खरंच अभिमान वाटला... प्लास्टीक बॉटल्स, प्लेट्स, इतर खाद्यपदार्थांचा कचरा हा केवळ गडापुरता किंवा किल्ल्यांपुरता नाही, सर्वच ठिकाणी जेव्हा आपण टूर निमित्त भेट देतो भारतात किंवा थेट भारताबाहेर तेव्हा ह्या गोष्टीची काळजी घ्या.. आपल्यासोबत कचऱ्यासाठी एक वेगळी इकोफ्रेइडली पिशवी बाळगा किंवा तिथे उपलब्ध असलेल्या कचराकुंडीत कचरा टाकायची सवय करा.. आज आपण बाहेर गेल्यावर आपल्या आणि आपल्या लहान मुल्लांच्या आरोग्यासाठी बिसलरी पाणी घेतो, पण त्याच रिकाम्या बॉटल्स इकडे तिकडे टाकून आपल्या लहानग्याच्या भविष्याला दूषित करतो आहोत, हि छोटी गोष्ट लक्षात घ्या.
त्यादिवशी मी बाहेर गेलेली, जाता जाता सहज भगवे टी- शर्ट, टोप्या घालून मुलांचा घोळका दिसला, नंतर लक्षात आले कि ते पायी शिर्डीला जात आहेत, छान वाटले उत्साह पाहून, असे बरेच उत्साही तरुण वर्ग आपल्या मुंबईतून थेट शिर्डीला पायी दरवर्षी जातात, रस्त्यात जागो जागी त्यांच्यासाठी नाश्ता, पाणी, जेवणाची सेवा म्हणून सोय असते, पण ते देखील तिथे पाणी पिऊन प्लास्टिक ग्लास, प्लेट्स, फळांची साले टाकून पुढे निघून जातात, पाहून खूप वाईट वाटले, मग मनात विचार आला कि ते त्यांच्या वाट खुणा सोडून जातायत.....
माझी एकच नम्र विंनती आहे, आपण नक्कीच नवीन स्थळांना भेट द्या, तेथील सौन्दर्याचा आस्वाद घ्या, ताजी हवा अनुभवा (आपण हवापालट करायलाच जातो ना), फक्त तिथे कचरा करून प्रदूषण नका करू, आणि कोण करत असेल तर त्याला पुढे जाऊन अडवा!!
आणि जर कोणी आपले गड़ किल्ले पहिले नसतील तर नक्कीच भेट द्या, आपल्या लहानग्या सोबत जायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
कविता ठाकूर
HappyMyTrip.com