माय आर्ट इज डूडलिंग… काही नवीन डूडल्स

बुकमार्क्स २ :

-----------------------------------------
मैत्रीण : ही वेबसाईट सुरु होत असताना काढलेलं हे डूडल. प्लूनी आजारी होते आणि डोक्यात 'मैत्रीण' चे विचार होते...

-----------------------------------------
समथिंग फिशी :
परवा वर्ल्डकप फायनलच्या वेळी न्यूझिलंडचा पराभव होत असताना ...
( पाठकोर्‍या कागदावर काढले आहे, त्यामुळे मागच्या बाजूचे प्रींट प्लीज इग्नोअर करा)

-----------------------------------------
बुकमार्क्स १ :

हे बुकमार्क्स चहाच्या खोक्यातले डीव्हायडर्स वापरून केले आहेत, चित्र काढून नंतर सेलोटेप वापरून लॅमिनीट केले.
---------------------------------------
फुलपाखरू : १० मिनीटांचं मायक्रो-प्रोजेक्ट

----------------------------------------
कॅनव्हास : 'वक्त की शाख से लम्हे चुराके' केलेलं असंच एक १० मिनीटांचं मायक्रो-प्रोजेक्ट

--------------------------------------------
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा .. सर्व मैत्रीणींना आणि त्यांच्या परिवाराला नवीन वर्ष सुखासमाधानाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो !

स्वस्थ बसणं माझा पिंड नाही, माझ्या प्रकृतीला ते झेपतच नाही.. त्यामुळे नवनवीन गोष्टी शिकायला , ट्राय करायला मनापासून आवडतात... डुडल आर्ट हा प्रकारही असाच. दरवेळी मनाजोगा, मोट्ठं चित्र काढायला वेळ मिळतोच असं नाही, पण जो जिथ, जिथे, जितका वेळ मिळतो त्यात डूडलायला मला आवडतं :)
आज गुढीपाडवा, शनिवार असूनही लॅबमधे काम आहे. टायमर चालू आहे, आणि त्या मधल्या ३- ४ मिनीटात बसल्याबसल्या सुचलेलं, आणि काढलेलं डुडल !

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle