नव वर्ष

कालची संध्या कानी कुजबुजली जाता जाता
सज्ज व्हा नव वर्षाच्या उषेच्या स्वागता
आम्रकुसुमांनी गंधित झाली ही हवा
साद देई प्रियेस कोकिळ हा हळवा
पहाट सुवासिक , उमलता निंबफुले
प्राशुन निंबरस , निरोगी सूर्य नभी खुले
सनईचे सूर, आनंदाचा पूर
निसर्गाचा नूर, पहा दूर दूरवर
हळदी- कुंकू सांडले नभांगणी
नि अंगणी तैसीच करु नक्षीदार मांडणी
लाल- पिवळा रंग फळे-फुले ल्याली
गंध मोगरा हुंगून अबोल झाली अबोली
पवित्र चिन्हे, गुढी-तोरणे शोभली दारी
पर्वणी ही नव्या उमेदीने करा साजरी

विजया केळकर_______

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle