टायटानिक

महाकाय रेखीव जहाज
जडशीळ होवुनी स्तब्ध ,
विसावलय काळोखी तळाशी
जीवनाचे प्राक्तन भोगत ,….

लखलखती झुंबरे
सुबक सुंदर गवाक्षे
काळवंडताहेत आस्ते आस्ते
रत्नाकरात रुतत …

अजस्त्र या धूडाच्या
पोलादी सांद्रींतून
सुळकताहेत सोनेरी मासे
विस्मयाने आरपार बघत

शाही रंगीत काचांच्या
तावदानातून स्वत;ला
निरखताहेत जलचर
प्रवाळाच्या साथीत

अद्वितीय रूपाचा
जणु महाल स्वप्नांचा
हा महाडोलारा जेव्हा ,
मानव होता बांधीत

तिकडे दूर सागरी
भला शुभ्र हिमनग
स्फटिकी शरीराचा ,
नियती होती रचित ……'

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle