टायटानिक महाकाय रेखीव जहाज जडशीळ होवुनी स्तब्ध , विसावलय काळोखी तळाशी जीवनाचे प्राक्तन भोगत ,…. लखलखती झुंबरे सुबक सुंदर गवाक्षे काळवंडताहेत आस्ते आस्ते रत्नाकरात रुतत … अजस्त्र या धूडाच्या पोलादी सांद्रींतून सुळकताहेत सोनेरी मासे विस्मयाने आरपार बघत शाही रंगीत काचांच्या तावदानातून स्वत;ला निरखताहेत जलचर प्रवाळाच्या साथीत अद्वितीय रूपाचा जणु महाल स्वप्नांचा हा महाडोलारा जेव्हा , मानव होता बांधीत Keywords: Titanic Read more about टायटानिक Log in or register to post comments