वाट सरळ,
वाट नागमोडी वळणाची.
वाट कधी आपलीच वाट लावणारी,
दमवणारी,
आपली परीक्षा बघणारी,
असंख्य खाचखळग्यांची.
तर कधी मोरपिसाप्रमाणे,
अलगद नेणारी.
आपल्या प्रवासात,
आपल्या वाट्याला,
वाट कधी कशी येईल,
सांगता येत नाही.
आपण मात्र चालत राहायचं असतं,
मिळेल त्या वाटेवरून प्रामाणिकपणे,
नवीन जोमाने, उत्साहाने, प्रयत्नपुर्वक,
आपले ध्येय गाठण्यासाठी.