वाट
वाट कशी सापडावी, घनदाट तिमिरी
जायचे जीवन गंगेच्या पैलतीरी ...
वाट कशी सापडावी, चांदण्यांच्या बाजारी
चंद्र नसे उभा शेजारी ...
वाट कशी सापडावी, लाल रणांगणावरी
समीर सांगतो 'लाल' बुडाला समरी ...
वाट कशी सापडावी, केशरी क्षितीजावरी
करावा जौहर तो निजला अंकावरी ...
वाट कशी सापडावी, प्रखर प्रहरी
सावलीही काकुळतीने पाय धरी ...
वाट कशी सापडावी, स्वप्नपटलावरी
जगते रहोचा गजर करी पहारेकरी ...
वाट कशी सापडावी, डोळे मिटल्यावरी
वाट आपोआप सापडावी डोळे मिटल्यावारी .....
विजया केळकर ____