निवांत मी-निवांत तुम्ही,
आणि निवांत हा रस्ता,
किती रंगतदार होतात नाही,
न बोलता आपल्या गप्पा.
मी नजरेने टिपत असते,
तुमचे सौंदर्य आणि विविध रूपं.
तुम्ही देता प्रतिसाद,
तुमच्या डोलण्यातून,
फुलांच्या हसण्यातून, गंधातून,
पानांच्या सळसळीतून.
मी जपून ठेवते मनात,
हे दुर्मिळ क्षण,
आपल्या पुनर्भेटीपर्यंत. :)