कुडकुडायला लावणारी थंडी कमी होऊ लागली की सगळ्यांनाच ऊबदार पण बंदिस्त घरातून बाहेर पडायचे वेध लागतात. आपणही मग पटकन घरात पळण्याऐवजी जरा बाहेर रेंगाळू लागतो. अजून बाहेरचं रंगहीन रुक्ष वातावरण तसंच असतं आणि अचानक कुठेतरी हिरवा रंग लक्ष वेधून घेतो. यावेळी तर मला एकदम जांभळासुद्धा दिसला! पाहुणे काही आगाऊ सूचना न देता उगवलेसुद्धा!
दारात हजर!
आणि हे म्ह्णतायत, we are almost there! (ओळ्खा पाहू आम्ही कोण?)
ते डॅफोडिल्सच आहेत, हे पहा उगवले.
हे सुद्धा येतच असतील, तोवर त्यांचे पोर्ट्रेट बघू.
यांना यायला अजून थोडा वेळ आहे. सगळे आल्यानंतर शेवटी हे येणार, अगदी वाजतगाजत. या सेलेब्रिटी पाहुण्यांना भेटायला जनता लोटते, पण आमच्या बॅकयार्डमध्येच येतात. हे गेल्यावर्षीचे फोटो.
बॅकयार्ड ब्लॉसम-
जसे येत जातील तसा त्यान्चा फोटो सेशन करायाचा विचार आहे यंदाही. हे निसर्गातले पाहुणे येती घरा, तोचि वसंता खरा!
तोपर्यंत हे प्रिन्ट करा आणि रंगवा! :) परवाच्या फोन कॉलचा सदुपयोग!
(सगळे फोटो आणि चित्रं मी काढलीत.)