माझ्या एका कवितेला दिलेले हे दृकश्राव्य रूप. अगदी वसंत ऋतुच यात आहे असे नाही. पण एकूणच निसर्ग आणि त्यातील सृजनता यात डोकावतेय म्हणून इथेही टाकतेय. यातील चित्र मी फोटोशॉप वापरून काढली आहेत. अन अॅनिमेट केली आहेत. आशा आहे तुम्हाला आवडेल :)
नुकताच गुढीपाडवा झाला. नवीन वर्षासोबतच वसंत ऋतूचे स्वागत करणारा हा सण. पानगळ सरून गेल्यानंतर कोवळ्या पानांनी बहरून जाणारा ऋतू. आपल्याकडे वसंत ऋतूचे आगमन होते साधारणतः तेव्हाच जर्मनीमध्ये देखील ऋतूबदल व्हायला सुरुवात होते.
वसंत ॠतूत सर्वत्र रंगांची मुक्त उधळण दिसून येते. विविध रंगांची फुले पाहून मन प्रसन्न होते. अशीच रंगांची उधळण किचनमध्ये करता येईल का? असा विचार मनात आला. पण निसर्गातील हा रंगांचा खेळ जसा आपसुक जुळून येतो, तसं काहीसं अपेक्षित होतं. मग ठरवलं नैसर्गिकरित्या म्हणजे कोणताही कॄत्रिम रंग न वापरता काही रंगीत पा. कृ. करावी.
मायबोलीवर पारंपारीक रोडग्यांची पा. कॄ. मीच पोस्ट केली होती. इथे लिंक देते.
सृजनाच्या वाटा या उपक्रमासाठी लारानं बनवलेली एक खास गार्डन थीमची मोबाईल फोन केस. मोबाईल फोन केस - थीम डेकोरेशन या धाग्यावर तिने नटवलेल्या इतर फोन केसेसची प्रचि आहेत.
वसंत ॠतू म्हटले की माझ्या डोळ्यांसमोर येते ती निसर्गातील 'नवनिर्मिती'ची प्रक्रिया.
शिशिरातील गोठवणार्या थंडीमुळे पर्णहीन झालेले वॄक्ष हलके हलके उबदार होत जाणाया ,हव्या-हव्याशा वाटणार्या सूर्यकिरणांमुळे कोवळी, लुसलुशीत पालवी धारण करु लागले असतात. काही दिवसांतच त्यांच्या अंगा-खांद्यांवर हिरवीगार पाने, कळ्या, फुले फुलू लागतात आणि सर्वत्र रंग-गंधाची उधळण अनुभवायला मिळते. या निसर्गाच्या आविष़्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचा पक्ष्यांनी जणू चंगच बांधला असतो ! जिकडे जागा मिळेल तिथे त्यांची घरटे बांधायची घाई, जोडीला कोकिळ-कुजन म्हणजे विणीचा हंगाम सुरु झाल्याची नांदीच !
अरिझोना मधला हलकासा हिवाळा आता कुठे सुरु होतोय असं वाटतं असतानाचं संपून जातो आणि वसंताची चाहूल लागते.
रस्त्यांच्या दुतर्फा विपूल प्रमाणात आढळणारी ही झाडं पिवळ्या फुलांनी नखशिखांत डवरतात
कुडकुडायला लावणारी थंडी कमी होऊ लागली की सगळ्यांनाच ऊबदार पण बंदिस्त घरातून बाहेर पडायचे वेध लागतात. आपणही मग पटकन घरात पळण्याऐवजी जरा बाहेर रेंगाळू लागतो. अजून बाहेरचं रंगहीन रुक्ष वातावरण तसंच असतं आणि अचानक कुठेतरी हिरवा रंग लक्ष वेधून घेतो. यावेळी तर मला एकदम जांभळासुद्धा दिसला! पाहुणे काही आगाऊ सूचना न देता उगवलेसुद्धा!
दारात हजर!
आणि हे म्ह्णतायत, we are almost there! (ओळ्खा पाहू आम्ही कोण?)