टॉमॅटो - ३
कांदा - अर्धा बारीक चिरुन
लसूण पाकळ्या - ५ ते ६
तेल - १ मोठा चमचा
फोडणीसाठी- हिंग, मोहरी, कढीपता( ४ ते ५ पाने),
लाल तिखट - २ चमचे
मीठ - चवीनुसार
कॄती - दोन टॉमॅटो बारीक चिरुन घ्यावे. कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, कढीपत्याची फोडणी करावी. मग त्यात कांदा , लसूण पाकळ्या ठेचून परतावा. त्यानंतर टॉमॅटो घालून परतावे. टॉमॅटोला सुटलेले पाणी आटले की तिखट , मीठ घालून, ढवळावे व गॅस बंद करावा. थंड झाल्यावर ग्राईंडरमधून फिरवून घेणे.
वसंत ॠतूत सर्वत्र रंगांची मुक्त उधळण दिसून येते. विविध रंगांची फुले पाहून मन प्रसन्न होते. अशीच रंगांची उधळण किचनमध्ये करता येईल का? असा विचार मनात आला. पण निसर्गातील हा रंगांचा खेळ जसा आपसुक जुळून येतो, तसं काहीसं अपेक्षित होतं. मग ठरवलं नैसर्गिकरित्या म्हणजे कोणताही कॄत्रिम रंग न वापरता काही रंगीत पा. कृ. करावी.
मायबोलीवर पारंपारीक रोडग्यांची पा. कॄ. मीच पोस्ट केली होती. इथे लिंक देते.