रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- टॉमॅटोची चटणी

ईट युअर कलर्स - रंग लाल

टॉमॅटोची चटणी

साहित्य

टॉमॅटो - ३
कांदा - अर्धा बारीक चिरुन
लसूण पाकळ्या - ५ ते ६
तेल - १ मोठा चमचा
फोडणीसाठी- हिंग, मोहरी, कढीपता( ४ ते ५ पाने),
लाल तिखट - २ चमचे
मीठ - चवीनुसार

कॄती - दोन टॉमॅटो बारीक चिरुन घ्यावे. कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, कढीपत्याची फोडणी करावी. मग त्यात कांदा , लसूण पाकळ्या ठेचून परतावा. त्यानंतर टॉमॅटो घालून परतावे. टॉमॅटोला सुटलेले पाणी आटले की तिखट , मीठ घालून, ढवळावे व गॅस बंद करावा. थंड झाल्यावर ग्राईंडरमधून फिरवून घेणे.

ही पारंपारीक चटणी तयार आहे.

मी केलेले अ‍ॅडीशन

उरलेला तिसरा टॉमॅटो उकळत्या पाण्यात घालून ठेवणे. मग त्याची साले काढून ग्राईंडरमधून त्याची प्युरी बनवून ती १ चमचा वरुन या चटणीत घालणे. यामुळे लाल रंग उठावदार दिसतो आणि टॉमॅटोची आंबट चव अधिक खुलते. वरुन कोथिंबीर शिवरावी.

कॅलरी चार्ट

Recipe name

tomato chuttney
Number of servings
Serves
4
people
Ingredients Calories Carbs Fat Protein Sodium Sugar Vegetable - - Tomato, 146 g 35 7 1 1 0 0 Ico_delete Onions, raw, 1 small 28 7 0 1 3 3 Ico_delete Garlic, raw, 1 tbsp(s) 13 3 0 1 1 0 Ico_delete Desi - Curry Leaves Green, 1 oz(s) 0 7 0 0 0 0 Ico_delete Add Ingredient Total: 76 24 1 3 4 3 Per Serving: 19 6 0 1 1 1

१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - हो १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - लाल रंग आहे २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क,
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क. इथला कॅलक्युलेटर वापरु शकता- दिला आहे,
६. कृत्रिम रंगाचा उपयोग-  68
८. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले नाही -  68
९. सांगितलं एक आणि केलं भलतंच -  68
१०. रेसिपीचे मार्क्स स्वतःच कॅलक्युलेट करुन लिहायचे. टोटल - ८

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle