शब्द

शब्द असे, शब्द तसे, शब्द कसे?

शब्द नजरेसमोर तरळूनही,
आकलन न होणारे.

शब्द मनात रुंजी घालूनही,
कागदावर न उतरणारे.

शब्द सभोवती फेर धरून,
आपल्यालाच नाचवणारे.

शब्द कधी कधी,
प्रसन्न होऊन आपल्यापर्यंत पोचणारे.

आणि शब्द कधीतरी,
भावनेचा कल्लोळ सामावून घेऊन,
आपल्यालाच नि:शब्द करणारे.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle