माझ्या फेवरिट गाण्यांपैकी ही दोन आहेत.
पहिले बातों बातों में मधले कहांतक ये मनको अंधेरे छलेंगे. उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे.
सिचुएशन अशी की हिरो ची गोड मुलीशी रिलेशनशिप जमत आली आहे आता फक्त लग्नाचे फॉर्मल बोलायचे. तर बारके मिस अंडरस्टॅन्डिग होते. हिरोची आई अडून बसते. जरा आखडू टाइप बाई आहे. वडील मवाळ व गप्प आणि हिरो तर प्रेमात. आता हा तिढा कसा सुटावा म्हणून हिरो प्रश्नात आहे. मुलगी खरेच गोड आहे. अश्यावेळी तो संध्याकाळचा चिंतित होउन बसला आहे. वडील बघतात पण सपोर्ट म्हणून काही अॅक्षन घेउ शकत नाहीत. किशोर कुमारने आपली सर्व मस्ती खोडकर स्वभाव बाजूला ठेवून एक आतला हळवा आवाज काढला आहे. लिरिक्स सोपे पण मन भावन आहेत.
मध्यमवर्गीय जीवनात बरेचदा असे हलके निराशेचे प्रसंग येतात. एक घाव दोन तुकडे असा आपला स्वभाव नाही मग बसतो कुढत आतल्या आत. अश्या वेळचे हे गाणे. मनातील
विषण्णतेला एकांतात वाट करून देणारे.
कहांतक ये मनको अंधेरे छलेंगे.
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे.
तालवाद्ये आजिबात वापरलेली नाहीत. अनप्लग्ड सॉफ्ट संगीत आहे.
कभी सुख कभी दुख
यही जिंदगी है
ये पतझड का मौसम
घडी दो घडी है.
नये फुल कल फिर डगर में खिलेंगे
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे
भले तेज कितना हवा का हो झोका
मगर अपने मनमें तू रख ये भरोसा
जो बिछडे सफरमें तुझे फिर मिलेंगे
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे.
कहे कोई कुछ भी
मगर सच यही है
लहर प्यार की जो कही उठ रही है
उसे एक दिन तो किनारे मिलेंगे
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे.
तर हे ऐकले की पुढचे गाणे ह्या हळव्या मनःस्थितीवर फुंकर मारून सुखाचे शिपकारे उडवणारे आहे. चित्रपट रजनीगंधा आणि मुकेश गायक. मुकेश बरेचदा दु:खी भावुक गाणी गातात. दोस्त दोस्त ना रहा, जाने कहां गये वो दिन, आणि इतर.
पण इथे अतीव मनापासून झालेला आनंद एक सुगंधी संध्याकाळ ते घेउन येतात. मनाची निराशा हळूच एखाद्या पातळ पडद्या सारखी उडून जाते. मन निखळ आनंदाने भरून जाते.
सूर्या स्ताच्या वेळी ऐकायला परफेक्ट गाणे.
ये दिन क्या आये.
ये दिन क्या आये.
संगीतही तसेच आहे. आनंदी गिरक्या घ्यायला लावणारे.
लगे फूल हसने देखो बसंती बसंती
होने लगे मेरे सपने
ये दिन क्या आये.लगे फूल हसने
सोने जैसी हो रही है हर सुबह मेरी
लगे हर सांझ अब गुलाल से भरी
चलने लगी महकी हुई पवन मगन झूमके
आंचल तेरा चूमके.
ये दिन क्या आये लगे फूल हसने
वहां मन बावरा आज उड चला
जहां पर है गगन सलोना सांवला
जाके वही रखदे कही मन रंगों में खोलके
सपने ये अनमोलसे
ये दिन क्या आये. लगे फूल हसने....
किती ते रंग, कसे ते सूख, काय तो आनंद. आपण प्रेमात आहोत आणि ते पूर्ण ते कडे पोहोचत आहे याची ग्वाही देणारे येणार्या सुखी क्षणांसाठी फुलांच्या पायघड्या उलगडणारे.
जरूर ऐका आणि डाउनलोड करा सावन वर उपलब्ध आहेत.