श्रावण पाऊस
आला आला पाऊस आला
संगे श्रावण मास हा आला
जीवाची सरली घालमेल
सणासुदीची रेलचेल
उन्हां पावसाचा लपंडाव
सोमवारी पूजा सदाशिव
मंगळागौर देईल वरदान
अर्पिता सोळा पत्री-फुले, सौभाग्यवाण
वंदा बुध-बृहस्पती
बनण्या विद्या वाचस्पती
आघाडा,दुर्वा,चणे-गूळघेऊन पूजती
लेकुरे उदंड करी आई जिवती
संपत शनिवार,राणूबाईचा आदित्यवार
व्रत वैकल्यांचा महिमा अपरंपार
शेतीसाठी नागांना वाचवा
नागपंचमी सांगे सख्यभाव जागवा
प्रेमबंधन राखीचं राखा
झाला कृष्ण द्रोपदीचा पाठीराखा
वन्देमातरम् चा करवा गजर
हाती ध्वज तिरंगा, उधळा अबीर
कड्कड् गड्गड् विजा चमकल्या
कृष्ण जन्मला, यमुनेस पूर आला .......
विजया केळकर _____