प्रवास जोवर संपत नाही

कुठून आलो?, ठावूक नाही
कुठे जायचे ?, ठरले नाही
अनेक वाटा, अनेक वळणे
भुलभुलैय्या संपत नाही

करू पेरणी!, करू नांगरणी
कष्ट कुणाला टळले नाही
पण कष्टाला फळ लागावे
माती इतुकी सुपीक नाही

कशास करतो? धडपड सगळी
नश्वर क्षण हा नश्वर नाती
उधळून द्यावे क्षणात सारे
असे कुणी उरलेले नाही

तरी उगवते सकाळ नियमित
नदी वाहते, थांबत नाही
तसेच म्हणते चालावे मी
प्रवास जोवर संपत नाही

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle