माझी लेक सतत नवनविन क्राफ्टच्या शोधात असतेच. गेल्या वर्षीपासून तिला स्वतःचा मोबाईल फोन मिळाला. मग त्या फोनला नटवणं सुरू झालं. पूर्वी कशा मुली आपल्या बाहुल्यांना नविन कपडे, दागिने बनवत? तसं हल्ली बहुतेक बाहुल्यांऐवजी हातात मोबाईल आलेत आणि मग त्यांना नटवणं आलंय. :biggrin:
काहीही सुंदर वस्तू दिसली की ती जमवायची. कोणतंही क्राफ्ट शॉप दिसलं की त्याला भेट द्यायचीच आणि उदार आश्रयही द्यायचाच. या सवयीमुळे तिच्याकडे भलामोठा खजिना असतो. यंदाच्या स्प्रिंग ब्रेकमध्ये फोन केसेस बनवायच्या हे तिनं ठरवलंच होतं. सुटीच्या दुसर्याच दिवशी अनेक रंगिबेरंगी फोन केसेस विकत घेतल्या आणि मग वेगवेगळ्या थीमने त्या नटवल्या. आता रोज बदलून बदलून त्या वापरतेय.
या त्या फोन केसेस. नावंही तिनंच दिलेली आहेत :
रेनबो
ऑन द बीच
फ्रुटी
अँटिक
पिंक शाईन्स
स्पाईक्स
स्प्रिंग गार्डन