साहित्यः एक वाटी ताजे मक्याचे दाणे( आमच्या इथे दहा रुपयाला सोललेल्या अमेरि कन स्वीट कॉर्न चे दाणे असलेली पाकिटे मिळतात. मी दोन तीन घेउन ठेवते. ऑफिसातून आल्यावर खायला बरी पडतात नुसती सुद्धा छान च लागतात. ) एक मध्यम साइजचा उकडलेला बटाटा, लसूण हिरवी मिरची, कोथिंबीर व जिरे ह्यांची एकत्रित पेस्ट, धने पावडर, आमचूर, चाट मसाला एक एक टी स्पून, चवी पुरते मीठ, तेल. कॉर्न फ्लोअर.
कृती: मक्याचे दाणे मिक्सरमधून अर्धवट पेस्ट करून घ्या. एका बोल मध्ये घ्या. बटाटा किसून घ्या व त्यात घाला. हिरवी पेस्ट मीठ धने पाव्डर आणि मीठ, आमचूर पाव्डर घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या. मग त्यात कॉर्न फ्लोअर दोन टे स्पून घाला. नसले तर ब्रेड क्रंब पण चालतील.
आता तवा गरम करत ठेवा व थोडे तेल त्यावर सोडून मिश्रणाचे कटलेट्स बनवून शॅलो फ्राय करून घ्या.
गरम गरम केचप बरोबर किंवा चिंचेच्या चट णी बरोबर सर्व्ह करा. वरील प्रमाणात सहा सात कटलेट होतात. कॉर्न मध्ये पाणी असते मी फ्रिज मधले ठेवलेले पाकीट वापरल्याने ते जरा जास्त पाणी होते. पण फ्रेश कॉर्न वापरले तर अगदी अंगा बरोबर खुट खुटीत होईल. ब्राउनीश सोनेरी रंगावर परतून घ्या.
अधिक टिपा: मुलांना शाळे तून आल्यावर पोट भरीचे खायला होईल. ह्यात आव्डत असल्यास ग्रीन पीज ताजे किंवा फ्रोझन मटार घालूनही करता येइल. पण पीज डिफ्रॉस्ट करून टिशू पेपर वर चांगले कोरडे करून मग वाटून घ्या. पाणचट झाले मिश्रण तर मिळून येणार नाही कटलेट तुटतील.
डीप फ्राय करायचे तर मिश्रण अगदीच कोरडे हवे. व कॉरन फ्लोअर ची पेस्ट करून त्यात बुडवून मग ब्रेड क्रंब मध्ये घोळवून तळा.
स्टार्टर म्हणून पण चांगले आहे व करायला सोपे.