तो निमित्त

तो निमित्त

उकडलेलं अंड घेऊन
ती माझ्याकडे सरकली
खाणारेस का म्हणताच
मला घरच्या बाप्पाची
आठवण झाली
नंतर.........
लंगरच्या रांगेत दोघी
एकमेकींना धरुन होतो
प्लेट कमी आहेत कळताच
एकातच जेवलो
पर्समधला सत्यनारायणाचा प्रसाद
आम्ही स्वीट डीश समजून खाल्ला
दोघींजवळच पाणी संपताच
इकडे तिकडे वळलो
संतत पाऊस तरीही उकाडा
त्यातही गोश्यातली ती
आमच्याकडे पहात होती
तिच्या हातातली बाटली
पाण्याने भरली होती
तिघींनी एकमेकींकडे पाहिलं
आणि.....
दुसऱ्या क्षणी ते पाणी
आमच्या घश्यात उतरलं
सर्वत्र हाहाक्कार .....पुरते बेहाल
पावसाचे थैमान.....
माझे जोडलेले हात, हिची हातात सरकती माळ
आणि प्रत्येक वाक्याला
तिचा या अल्लाचा पुकार
कितीतरी तास आम्ही एकत्र
कुडकुडंत
आमच्यातलं अनोळखीपण
होतं गळंत
ओसरला पाऊस,उजाडला दिवस
एव्हाना आमची झाली होती ओळख
निरोप घेताना एकमेकींचा
म्हणाली ती,
कभी याद आयी
तो जरूर मिलेंगे बहन
मी हसून म्हटलं
एकत्र यायला कशाला हवे कुठले कारण ?
पावसाकडे पाहिलं
मनात म्हटलं
तू कितीही शिकव, अद्दल घडव
आम्ही मात्र............

अंजली मायदेव
30/8/2017

मुंबईत आणि सर्वत्र झालेल्या पावसामुळे सुचलेली

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle