माझी नवमैत्रिण मैत्रिण वरची एक सेलिब्रिटी आहे , आधी तीचे नाव बघून मी जरा धास्तावलेच होते , कि हिला आता काय शिकवाव, हिच्या तर रेसिपीज पण वाचल्या आहेत , माबोवर .. म्हणजे माझ्यासाठी सुगरण कॅटेगरी. मला ह्या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडा ट्रेनिंगला दुसर्या ऑफिसला जावे लागले जे बरच लांब आहे त्यामुळे तीच्याशी थोड्या गप्पा झाल्या पण अजून फोन बाकी आहे. तीनेच सुचवले कि तु अरेबिक डिश शिकव. मला विना कटकट रेसिपीज आवडतात(रीड जमतात ) मी फलाफल केले होते आधी , अरेबिक लोकांची ही प्रोटीन रीच पण विना खटपटीची डिश मला आवडते आणि जमते. म्हणून तेच शिकवते असे मी तीला जवळ्पास सांगितले. तीला गोड पदार्थाची रेसिपी पण पाहिजे होती पण मला अजून अरेबिक बकलावा शिवाय काही माहित नाही आणि बकलावा मी करायचा विचार ही केला नाहीये , तर शिकवणे दूर. आता ह्या विक मध्ये ट्रेनिंग नसेल त्यामुळे जरा वेळ मिळेल नविन काहीतरी शोधायला ...
माझ्या नवमैत्रिणीसाठी मात्र पेपर सोपा होता कारण आम्ही बिगरी कॅटेगरी. मी तीची ही आप्प्याची रेसिपी वाचली होती पण करायचे राहून गेले होते , शिवाय ते फुगतील का नाही ही शंका होती ... पण आता दस्तुरखुद्दच मार्गदर्शन करणार म्हंटल्यावर चिंताच मिटली , मी तीला तू मला हेच शिकव सांगितले
पाककृती मी माबोवरचीच आणत आहे इकडे
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)
पीठ भिजवण्यासाठी ताक
क्रमवार पाककृती:
१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस ताकाने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.
आप्पे एक्दम मस्त झाले होते. ओट्स न खाणार्या कंपनीनेही आवडीने खाल्ले. ओट्स चा चिकट्पणा अजिबात जाणवला नाही आणि रवा असल्यामुळे ती पुठ्ठा टेस्ट पण लागली नाही . धन्यवाद पूनम , इतकी सोपी रेसिपी आहकी, नक्की होत राहतील
मै टीम पुन्हा एकदा अभिनव उपक्रमाबद्दल धन्यवाद.