कुणासाठी किती किती
केले कष्ट ना मिती
उगवून फुटले रुजले
वाढले उंच उंच वृक्षा वरती
सोसले ऊन वारा थिजल्या
भिजल्या काळोख राती
ऋतू मान अन वर्षे सरती
एक दिवस उघडली संचित पेटी
अलगद हलके हलके डोलत
तुटत होते पाश किती
आंदोलने आत बाहेर
अस्तित्वाची गेली भीती
पक्व फळातून अलगद देठ
सोडत मुक्त म्हातारी ती .
मुक्त मोकळी म्हातारी ती
रश्मी भागवत
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle