हाती बाळाच्या कपड्यांची,
दुधाच्या बाटल्यांची,
स्वतःच्या ऑफिसची व पाठीवर लॅपटॉपची,
पोटावर बेबी सॅकची,
मेंदूत कामाची,
मनात असंख्य विचारांची,
पायात अनंत अंतरांची,
गाडीत असीम वेगांची,
कसली कसली ओझी घेऊन भिरभिरलीस?
कसल्या कसल्या अस्थिरता,
पैशांच्या,
करिअरच्या,
घरकुलाच्या,
पिल्लाच्या,
घरच्या,
सगळ्या काळज्या गिळत,
काम करत राहिलीस....
अमर्याद कष्टांच्या उखळात,
उद्याचे दळण कांडणारी जनाई आणि तुझी जनुके एकच की!
रश्मी भागवत