लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण १४ औंस)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क) किंवा दीपची मावा पावडर)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
क्रमवार पाककृती:
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
वाढणी/प्रमाण:
साधारण १२,१३ वड्या.
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle