पहिला हा आकाश दिवा माऊलीच्या ग चरणी।
चैतन्याच्या साम्राज्याची झाली सुरू की दिवाळी।।
पहिली ग ज्ञानज्योत माऊलीच्या देव्हाऱ्यात
शांत तेवते ह्रदयी तम अज्ञानाचा अंत।।
पहिली रेखिते रांगोळी,वैष्णवांच्या ग अंगणी
माऊलीच्या ओव्यांचे ग रंग भरते रंगणी।।
पहिले ग उटणे ते लावूनी मम् माउलीला
शांत उटी लाऊनिया, शांतविते भवतापाला
पहिले फराळताट ज्ञानक्षुधा तबकात।
विश्वशांतीच्या तृप्तीचे मिष्टान्न ते वाढत।
उजळून विश्वमन राहो प्रकाश भरोनी।
आनंदाच्या शलाकांची कारंजी ती उडवोनी।
समाधान नित्य नांदो,अवघ्या जनी आणि मनी।शुभ इच्छा चिंतूनिया साजरी करा दिवाळी।।
रश्मी भागवत।।
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle